दादा कोंडके / Dada Kondke


दादा कोंडके
हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.
दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र'रत्ना'चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले 'दादा' म्हणून ओळखले जात असे. ही 'बिरुदावली' नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. 'अपना बाजार' मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवा दलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.
लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकर पणे घालवण्याचा निश्चय केला.......
नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.
पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा-दलातील साथीदारांना पाहवले नाही. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला आणि शाहीर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या 'विच्छा माझी पुरी करा' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. 'विच्छा'चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही.
जून १९७१, 'सोंगाड्या' प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरे, जे तेव्हा फक्त 'मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे' होते, त्यांनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला. इतका की बऱ्याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा 'तेरे मेरे सपने' उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले.
७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणली.
१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात पुन्हा पडद्यावर आले.पांडू हवालदार मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.मुंबई पोलिसांचा हा हवालदार box office वर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.
दादा विरुद्ध सेन्सॉर बोर्ड अशी खुली जंग. अर्थातच आता मागे वळून पाहताना दादा त्यांना किती भारी पडले, ते दिसतंच.
तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे आणि 'तेरे मेरे बीच में' हे सिनेमे प्रदर्शित झाले आणि आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमानंतर दादांनी थेट गिनीज बुकात एन्ट्री मारली. आल्फ्रेड हिचकॉकचा सलग आठ चित्रपट रौप्य-महोत्सवी असण्याचा रेकॉर्ड तुटला आणि तिथे वर्णी लागली दादा कोंडके यांची.
इतकं होऊनही दादा कोंडकेंना पांढरपेशा समाजाने कधी स्वीकारले नाही. इंग्रजी सिनेमांतील उत्तांग प्रणयदृश्ये शौकीने पाहणाऱ्या पांढरपेशा समाजासाठी, स्त्री-पुरुष यांच्या नैसर्गिक संबंधांतले गांभीर्य विनोदातून साकारणारे दादा कायम अश्लीलच राहिले. दादांनीही या वर्गाला मग फाट्यावरच मारले. दादा म्हणायचे की मी किती जरी उत्तम सिनेमा बनवला, तरी उच्चवर्गीय तो फक्त एकदा बघणार, बरी-वाईट प्रतिक्रिया देणार आणि विसरून जाणार. त्यापेक्षा मी असे सिनेमे का बनवू नये की जे एखाद्या श्रमिकाने चार वेळा पाहावेत आणि आपला रोजचा ताप-ताण विसरून मनसोक्त हसावे. दादांचा सिनेमा 'माण'साठी होता, एखाद्या विशिष्ट 'क्लास'साठी नव्हे.
"कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रकाशित केला.
१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशीत केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनर खाली केला.
एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शन ची टीम वर्षो न वर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायना साठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत......
लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.
हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६) व आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशीत केले.
१९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धरतीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट प्रकाशीत केला......
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये' ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरुपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेउन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.... चाहत्यांकडून स्वत:च्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत...... कुणी त्यांना आपल्या मुला बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्घाटनाचे.... पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वत:चे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव !
वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवीयां' हा चित्रपट प्रकाशीत करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले...... मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले...... पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.
दादा बाळासाहेबांच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या खूप जवळ आले होते. शिवसेनेच्या प्रचारसभेत त्यांनी केलेली भाषणे युट्युबवर आजही ऐकताना हसून हसून डोळ्यात पाणी येते. शिवसेनेने दादांच्या प्रभावाने बरीच माणसे खेचली. आंध्रात याच कालखंडात झालेल्या निवडणुकांत १९८२ साली एन.टी. रामाराव यांनी सत्ता काबीज केली होती. राजकारणात यामुळेच दादांचे लक्ष वेधले गेले आणि नुसते प्रचारक न राहता दादांनी सक्रीय राजकारणात उतरायचा प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुखांशी असलेल्या जवळकीचा दादांना पुरेपूर फायदा होईल असे वाटत असतानाच ऐनवेळी बाळासाहेबांनी फासे पालटले. तिकीट शिवाजी पार्कातच मिळाले, पण दादांना नव्हे, तर मनोहर जोशींना. पुन्हा हेटाळणी.
दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती..... सेन्सॉर च्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्वींनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.
दादा सर्वसामान्यांत सर्वसामान्य बनून राहिले. मुंबईत अथवा बाहेर कुठेही त्यांच्या वावरण्यात कधी गर्व प्रकटला नाही. "जर मी एखाद्या स्टारसारखा वागू लागलो, तर मला आरशात स्वतः कडे पहायची लाज वाटेल. मी सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो, सामान्य म्हणूनच जगणार", अशा शब्दांत दादा त्यांचे मत मांडायचे.
मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रुषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लिलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.......
मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापीत केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.
आयुष्याच्या अखेरीस दादा खूप एकटे पडले होते. त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात, "देवा, पुढल्या जन्मात मला पैसा नको, प्रसिद्धी नको, ऐषाराम नको. फक्त माझी म्हणता येतील अशी चार माणसे दे." आपल्याला इतके भरभरून देणाऱ्या या कलावंतास श्रद्धांजली आणि अपेक्षा करू, जो मान त्यांना हयातीत मिळावयास हवा होता, तो निदान मरणोत्तर तरी मिळावा. निदान स्वर्गात तरी दादांना शांतता मिळावी, हेटाळणी नव्हे.
आज जर दादा कोंडके हयात असते, तर आजच्या सिनेमांत-टीव्हीवर चाललेला नंगा-नाच पाहून त्यांनी जनतेला खुल्ला विचारलं असतं की "तुमच्या मायला, तुमची 'अश्लील'ची नेमकी व्याख्या तरी काय आहे?"
मराठी चित्रपट सृष्टीवर दोन दशके आधिपत्य गाजवलेल्या व निर्विवादपणे मऱ्हाटी जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेल्या ह्या नटवर्याची काही गाणी यू ट्यूब वर बघताना त्यांच्या चारित्र्याचा मागोवा घेण्याचा विचार डोक्यात आला..... विकिपीडिया चा संदर्भ घेत त्यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला व थोडे फार वाचल्यावर जाणवले की ह्या मऱ्हाटमोळ्या माणसावर मायबोलीत काहीच लिहिलेले नाही..... म्हणून हा लेख प्रपंच !
_____________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Dada Kondke

It was a Marathi actor and filmmaker. He acted in Marathi films and films. Dumb, humorous, unfriendly communicating made his roles popular. In addition to his acting, he also produced films in Marathi and Hindi and Gujarati languages ​​along with his predecessor.

Dada is born in Lalbagh, a mill worker. On August 8, 1932, these sons, Ratna, who received Gokulashtami's good wishes, were named as Krishna. At the same time, Krishna's leela started coming out. At school age, he was known as 'Dada' in the lane. This remains after 'Birudawali'. The responsibility of maintaining the house was due to the death of older brothers. While working at Rs 60 per month in 'Apache Market', Dada started working in the service-band of the band. The noise of the music is not quiet, therefore, to reprise famous songs, to create strange songs, to make them move, they have developed hobbies from time to time. While serving in the service team, his knot fell down to Neelu Phule, Ram Nagarkar. And the grandfather started doing big things in the services of the service's grandfather.

From his childhood, he used to work at 'Apna Bazar' with his grandfather's grandfather. In an interview with Sodawater bottles, stone-wicks have been said. In a single year, he narrowly denied his family members, and since then alone, Dada Kondekeni decided to spend his life with his life.

In the area of ​​Naigaon - they started identifying people as "bandwale dada". There they got friends of greedy friends. Even after the superstar, Dada goes there and gets married in the old Friends Circle.

In the path-drama, the celebrations of celebrities who have laughing at their humor have not been seen by their service-team colleagues. Leaving the roles of 'King of Khanakhanpura', leaving the service team fiercely, Dada raised his own fruit and Shahir Dada Kondke came back from the play 'Vachan Mera Puri Karat' of Vasant Sabnis. This turn of the grandfather's life has been greatly appreciated on the future of the grandfathers and the whole of Maharashtra. He never looked back and looked back. There were more than 1500 experiments in 'Wichaa'. And like the grandfather, the gemstones fall under the eyes of Bhalji Pendharkar.

In 1969, Bhalji Pendharkar's "Tambadi Mati" appeared in the film, but he did not look back.

In June 1971, 'Songadhi' was released. Songgad did not get the cinema at the beginning. Balasaheb Thackeray, who was only 'fighting for the rights of Marathi people', he facilitated the cinema hall with Songgad and triggered a storm. So many of the cinema-makers walked God's pleasure, and 'Songs of my dreams' were replaced by SongDaddy. Maharashtra lifted the Sanguadas on the head. Dada Kondke had been overwhelmed with unprecedented achievements. With full use of the popularity, he used to announce the next film soon after the grandfather and the Bollywood throws up.

In the year 72 'Ekta jiva sadashiva' was displayed. The film was so busy that Raj Kapoor himself started posting the ball and postponed the date of the movie and 'Bobby' was released for five months late. It is said that while appearing in Bobby, Raj Kapoor had to request the cinema hall to remove Ekta Jee Sadashiv. Bobby Gazlach, but after the blind 'blind eye' behind it, the light-light was again brought to Dada Kondka.

In 1975, Pandu again appeared on the screen as a constable. In the Pondu Havaldar, Dada gave opportunity to the awards artiste 'Ashok Saraf'. From this, there is a foresight of his grandfathers. This constable has been heavily burdened with an MI6 agent on the box office of Mumbai Police. Cinema houses can not find MGM in Mumbai due to Pandu constables. Never, James Bond's film flopped in Maharashtra. In addition, the size of the herpes has been rising.

Dada versus censor board such an open battle Obviously, seeing the back of the grandfather, they saw how heavy they were.

Yours sincerely, Ram Ram Gangaram, Boat Laverne, Gudgule, Hoechwab, and 'Tere Mere Beech Mein' were screened and after the first Hindi film, Dadasaheb started directing Guinness Bookwriters. Alfred Hitchcock's record of eight consecutive films of silver-fest was broken, and Dada Kondke was overwhelmed.

Even so, Dada Kondkenna has never accepted a white colony. Grandfathers who are from the genre of humor in the natural relations of the men and women for the white society, who are heartbroken by the melodramatic scenes in English movies, are always indifferent. The grandfather also struck this class on the ditch. Dada used to say that how much film I made, but the higher class will see it only once, give a bad reaction and forget about it. Why should I not make films like this that a worker should look for four times and forget their daily stress and forget about it. Dad's movie was for 'Maan', not for a particular class.

Dada published 4 Hindi and 1 Gujarati film that released 16 films by "Kamakshi Productions" film production company.
Learn about how to put a complete faith in someone. Team of Kamakshi Productions persisted for years .... Usha Chavan, the music of the actress Ram Laxman, Mahendra Kapoor and Usha Mangeshkar - for the playback singing and Bal Mohite If you ask this question in the 'Quiz' program, 'Chief Director Assistant', you should give very quick answers.

Later he made the Guinness Book of World Records for the silver jubilee of 9 Marathi films.

Hindi - Tere Mere Mein Mein (1984); He released his films in the dark night (1985), Opening My Zuban (1986) and Further Thinking (1989).

In the year 1977 Pandu Havaldar released the Gujarati film "Chandu Joddar" on the soil of this Marathi film.

He played the role of Namo in Songdha, and he was the turning point of his life. Namiya goes to the Kala-a-kav to the tamasha and does not like her 'Aya' that takes a gigantic look. It is a story that she takes her out of the house and goes to the shelter of Kalawati and comes to Tamaula in Tamasha. This naive 'Namya' has kept the grandfathers one night at the top of the success. But in the lifelong life the grandfather of the same 'Namya' was born simple. His fans did not let him go back to Maharashtra to meet him at Tadde's Kamakshi office and never let him get frustrated. Photo session with the fans is their separate daily event. Do the fans listen to their conversations, moments and moments in their own way ....... Anyone can invite them to invite their children to the wedding, and the opening of some shops ... But the simple film 'Tambadi Moti' was made by this simple Bharti Natsmratta holding his own feet firmly on the same soil! It's impossible to get a really down-to-earth drama like them!

The beginning of the successful career of controversial grandfathers should also be a controversial issue. The owners of the Kohinoor film decided to release the film 'Three Goddesses' by Devnand, beside the Advance reservation of the grandfathers. Dadasaheb Thackeray chanted ... What do you think? Shiv Sainik laid out "Rada" outside Kohinoor Once the Kohinoor owners got the bump, they had to make an offer to display 'Songdadi'. But the Songdun Super Dupar became a hit and there was no excitement in the Marathi film industry.

Dada was very close to Balasaheb and, moreover, Shiv Sena. Late in the Shiv Sena's public meeting, listening to Youtube on today, laughing smiles and laughing. Shiv Sena used to be influenced by the influence of many people. In the same elections in Andhra Pradesh in 1982, the N.T. Ram Rao had captured power. Due to political reasons, he was attracted to the attention of the people and, instead of being a publisher, without any preachers, Dad used to move to active politics. Balasaheb had changed the dice while he was feeling that he would be benefited from the close relatives of the Shiv Sena chief. Tickets were found in Shivaji Park, but Manohar Joshi, not to the grandfathers. Scream again

His only career was controversial ...... To go against the tendency of not following the sensitivity of the sensor; Bind them to Shivsena; Their love; His personal life and the controversies arising after his death should be aspects of a controversial character. They were married by law and they had daughters named after them by brightness. But they were unmarried in public.

Dada remained common in general. Never before in Mumbai or anywhere outside, pride has not been shown. Dadasaheb said his words, "If I start acting like a star, I will be ashamed to see myself in a mirror. I am born as a common man and will live as a normal person".

3 March morning on March 14, 1998 At 30 Rama resident Dadar's house, they suffered a heart attack. They were mobilized in the same nursing nursing home. Earlier on the day his dear Dr. Anil Wakankar had examined him, but finally he was rescued in his nursing home. At that time his elder sister Lilabai More was alive. Kundane Vijay Kondankeni cremated them .......

Even after death, the rivalry prevailed over. Regarding Heritage Rights of Heroes Dada had asked to have a body set up in the death certificate in order to establish his estate. Usha Chavan as Trustee, Dr. Anil Wakankar, Sabir Sheikh (then Labor Minister), Gajanan Shirke and Vasant Bhlekar. Later, the heirs of his grandfather challenged his death sentence to the court and all his wealth was controversial.

At the end of his life grandfather had fallen too much alone. In their autobiography they say, "God, do not give me money in future life, do not be amazed, only give four people that can be told by me." We should pay homage to this kind of artist and expect him to be honored in the lifetime of the Honor. Dignity is not to be found in heaven, but it is not scary.

If today's grandfather Kondke is alive, he would have openly asked the public to see the naked dance on the TV in his films, "What is your definition of 'mine', your 'porn'?"

Marathi film industry has won two decades of independence and unquestionable people.
If today's grandfather Kondke is alive, he would have openly asked the public to see the naked dance on the TV in his films, "What is your definition of 'mine', your 'porn'?"

Looking at the tube on the tube, some songs of this dance made in Taiyit for the last two decades of the Marathi film industry were unconvincing and the idea of ​​taking a trace of their character .... In the context of Wikipedia, tried to unravel their biography and after a little bit of reading, Nothing has been written on me at all This article is published!

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने