क्रांतिसिंह नाना पाटील / Krantisinh Nana Patil

क्रांतिसिंह नाना पाटील (३ ऑगस्ट, इ.स. १९०० - ६ डिसेंबर, इ.स. १९७६) हे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

क्रांतिसिंह नाना पाटील गाव सांगली  जिल्ह्यातील येङमचछिद हे आहे.


१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.


यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ मिरज मध्ये निधन झाले.
_________________________________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Krantisinh Nana Patil
Krantisinh Nana Patil (3 August, 1900 - 6 December, 1976) was an Indian freedom fighter and a post-independence Marathi politician.

Krantisinh Nana Patil is a political activist, who is the leader of the freedom movement in Maharashtra (mainly in Satara, Sangli region) and also using the unique experiment of parallel government.

Nana Patil was born in Bahiborgaon in Sangli district. Since childhood, Nano had great gift of the body. That is why, in the coming years, people were attracted to him because of his outstanding personality.

After completing his education, he worked as a Talathi for some time. But the young man, who has a social desire and a politician, soon got out of work. He was involved in the independence struggle since the 1930 Civil Disobedience Movement. Their work is going on in both ways of independence and development of Bahujan Samaj.

Krantisinh Nana Patil Village is a Yehngchachid in Sangli district.

He left his job to work in the 1930 Civil Disobedience Movement. He tried to make the rural people aware of slavery, making the people brave. The Wanakari sect was influenced by the Nan. Nana also had the guts to make inspirational speeches in the language of the people, to inspire them. Krantisinh's main contribution is to make people aware of the selfishness of the people of the Bahujan community and join them in the freedom struggle.

They thought that the British government should set up a parallel government system. He said, 'I do not want to do this.' In 1942, the Movement Movement came into force with direct implementation. The concept of counterparty was brought into effect by the knowledge that we should be responsible for the control of our country. Through public support, public utility works like public ones, food supply and market administration are being done. In 1942, during the decline of British rule, he established an independent state in Satara district. Veteran poet c. D Madgulkar was done through written poems and by the sound of Shahir Nikam.

Through this counter-government, many social activities were being undertaken for market administration, supply of food, establishment of judicial courts to resolve the dispute, the dacoits-exploiting lenders and rigorous punishment to the students. Under this government Nana Patil established a military force named 'Tufan Sena'. Nana Patil successfully executed the technique of attacking British trains, post and other such services. Between 1943 and 1946, in every 1500 villages of Satara and Sangli district there were contingents working. This concept was used in many places in the country.

He was influenced by Mahatma Phule's Satyashodhak ideas and the work of Rajarshi Shahu. He tried to make 'Gandhi-Nivar' marriage arrangements at a very low cost, as well as social reform through the spread of education, establishment of libraries, eradication of superstition, and the de-addiction of the rural people. They had activists like Shahir Nikam, Nagnath Anna Nayakavadi and others.

After the country's independence, Nana took part in a joint Maharashtra movement. He worked through the parties of the Farmers Labor Party and the Communist Party of India. In 1957, he was elected to the Lok Sabha from North Satara constituency. He was elected to the Lok Sabha from Beed constituency in 1967 as a candidate for the Communist Party. He was the first MP to speak in Marathi from Parliament.

From the pre-independence era, the Sangli district, along with the continuous light of an inspirational personality throughout Maharashtra, was organized on 6th December. 1976 died in Miraj.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने