रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील / Raosaheb Ramrao Patil alias R R Patil

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांचा हा दै. लोकमत मधील लेख खास आपल्या वाचकांसाठी…
 मी , आर आर …..
नमस्कार .
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.
लोक मला प्रेमाने आबा म्हणतात. आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.
१६  ऑगस्ट  १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या  शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो.  पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर मी वकिलीचेही  शिक्षण पूर्ण केले.



माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर  १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९  साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो.
महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं  त्यामुळे पवार साहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं.
मी स्व:त बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या  निमित्ताने मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो . गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी  पवार साहेबांनी माझ्यावर दिली.  माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ  करण्याचा मी प्रयत्न केला . त्यात मला किती यश आले हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.
माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण , महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब  यांचा खूप मोठा प्रभाव आहे.  त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलीसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या  भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी , क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यात मला फार यश आले अथवा नाही याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.
मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली  माणसे यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुख-दु:खे  जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं.
सत्ता, पैसे येतात आणि जातात पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा  विश्वास उडत चाललेला दिसतो याचे मला खूप वैषम्य वाटते. अश्या वेळी रेड-इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हणलेली  एक म्हण मला नेहमीच आठवते. ती  म्हणजे , “जो पर्यंत शेवटचं  झाड मरत नाही, शेवटची नदी  सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तो पर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही.”
माझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे तसा आहे त्याला माझा ईलाज नाही. काहींना मी आवडतो काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.
माध्यमांनी मला प्रेमाच्या प्रसिद्धीचं  जसं शिखर दाखवलं आहे तसच त्यांनी मला निंदेचा तळही  दाखवला आहे. त्यामुळे आता मला गैरवाजवी टीका किंवा स्तुती बरोबर ओळखता येऊ लागलेली आहे.
या ब्लॉग च्या माध्यमातून जो संवाद मी आपल्याशी साधत राहीन ते शब्द आणि ती वाक्य हे माझ अधिकृत म्हणणं आहे . माझं म्हणजे  (आर आर पाटील ) याच . ते जसच्या तसं आपण छापायला माझी काही हरकत नाही.





सौजन्य- दै. लोकमत
-----------------------------------------------------------------------------

______________________________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Raosaheb Ramrao Patil alias RR Patil


Former Deputy Chief Minister of Maharashtra RR Patil Died on 16th February 2015 in Mumbai. His articles on the Daily Lokmat specially for his readers ...

 I am RR ... ..

Hello

I am Rao Saheb Ramrao Patil (RR Patil)

People say love to me as Aba. And now that's my identity.

On 16th August 1957, I was born in Tasgaon taluka of Sangli district of Maharashtra state. Anjani is my hometown. P. B. In the school of Patil, I learned to labor in my childhood. Later, at the Shantiniketan College, I took the degree of Arts branch in Sangli. And then I completed the education of advocacy.

In my initial political career, I first became a member of Zilla Parish from Sangli from 1979 to 1990. Later, I was elected to the Maharashtra Legislative Assembly in 1990, 1995, 1999, 2004 and 2009.

I implemented Gadge Maharaj Sanitation Campaign as a Minister for Rural Development in Maharashtra, so that I got cheers and encouragement from Pawar Saheb and the people of Maharashtra.

I'm a very manic person to talk about myself. I am also very hesitant to say what I tell you about me on the occasion of this blog. As Home Minister, Pawar has given me the big responsibility of cabinet rank. I tried my best and I showed it to my dedication and meaningful Sharad Pawar who believe in this work. People of Maharashtra want to decide how much I have achieved in this. I do not want to say anything on this blog.

My life has great influence on late Yashwantrao Chavan, Maharashtra's great public leader Vasantdada Patil and my respected leader and inspiration Sharad Chandra Sharad Pawar. I am constantly trying to create fear among the people of Maharashtra by making the fears and credibility through the police in the people of Maharashtra. Apart from the role of a responsible NCP worker, I am able to give my party more strength to the party through my intelligence, ability and hard work. Has tried. My leaders and my colleagues can tell me whether I am successful.

I like the simplicity. People with simple, low-level people like to chat with them, they love to know their sorrows. I think the ruling man needs it very much.

Power, money come and go, but the people who are connected and the real friends of life, the best of the body is the true wealth of man. It seems to me that there is a lot of confusion about the belief that the community around us seems to be flying. At times, I often remember one of the words that the red-Indians call for the American people. That is, "until the last tree dies, the last river does not dry up and till the last fish is killed, these people will not know that man can not live up to his money."

I do not want to write more about me. I am not as much as I am. Some of my favorites I do not like. I have no animosity towards those whom I do not like.

The media has shown me the peak of love's fame, and they have shown me the drowsiness of slander. So now I have been able to identify with bad criticism or praise.

Through this blog, I say the word and the sentence that I am going to associate with you, that is what I call the official. This is my name (RR Patil). I have no problem to show you that.


Courtesy- Daily Lokmat


(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने