श्री गाडगे महाराज / Shri Gadage Maharaj

श्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला.
श्री गाडगे baba / Shri Gadage baba
श्री गाडगे महाराज / Shri Gadage Maharaj

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. एके दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला. रात्रभर त्यांना स्मशानात बसवून घेऊन आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगे महाराजांना  दिली. गाडगेमहाराजांना त्या जटाधारी योगी सत्पुरुषाने देवीदास म्हणून संबोधिले.
एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्व झोपी गेले असता सर्वस्वाचा त्याग करून ते निघून गेले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी, लोककल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरिले. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.
लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केला. प्रसार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते. गाडगेमहाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. 'गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला' असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.
गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे त्यांनी यशस्वीरित्या राबविली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. जाती, धर्म व वर्ण यांतील भेद त्यांच्याजवळ नव्हता. समतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती. लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ति बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला. महाराजांनी जगाच्या कल्याणात आपले जीवन कष्टविले. आपल्या कर्तृत्वाने ते वंदनीय बनले.

Web Title : Shri Gadage Maharaj

________________________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Shri Gadage Maharaj

Mr. Debjzi Zingaraji alias Gadge Maharaj was born in Kheda in Vidarbha. They were from parrot community. Gadge Maharaj observed from the eighth year of his age the misfortune of his family, the backwardness of our society and the rigors of the society. Shri Maharaj sprayed his maternal farming with his own infinite efforts and put an ideal of his labor before his society, which is ignorance, poverty, and superstitions.

Gadge Maharaj was living his life hard work. One day, the bright Yogi came to the field and offered them a special gift. He laid his body in the cemetery all night and gave his Parimalic spiritual practice to Gadge Maharaj.
One night, when all the people fell asleep, they left all the while leaving. Gadge Maharaj took twelve years of ignorance. After that he used to exercise his hard work for social welfare, to distribute his body, mind and wealth in public service. During this period, Gadge Maharaj patronized the worm, wearing a headgear and digging the dharmashram. People started calling him Gadge Maharaj with respect.

In the path of the village, he traveled all over the country in the vicinity of the village to save his life. After clearing the streets of Viveka, they cleaned the people's mind. In the village, in the city, the kirtan went on
Told Emphasizing the importance of education, Gadge Maharaj convinced the people. Propagate literacy. Spread it. Gadge Maharaj was a rotational university that was popularized by people. Gadge Maharaj was not well-educated; But the abhanga of the saints was a memo for them. After hopping 'Gopala Gopala Devki Nandan Gopala', Haripath said immediately. When Gadge Maharaj has a kirtan, people come from long distances to listen to it.

Gadge Maharaj built Dharmashala at Pandharpur, Dehu, Alandi, Nashik and Mumbai. He successfully implemented many works of mass welfare. He spent his life in a hereditary and religious way. They did not have any distinction between caste, religion and caste. They were proponents of equality. There was tremendous feeling of welfare in his heart. People worshiped them as saints. He has done a lot of work for the general public. Finally, he kept his body at Amravati. Maharaj did his life in the welfare of the world. By virtue of its merit they became vane.

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

1/Post a Comment/Comments

  1. कृपा करून कुठल्या महापुरुषाला कुठल्याही जातीत/समाजात अडकू नका. कुठल्याही महापुरुषाला त्याच्या समाजाने मोठे केले नाही. ती वक्ती मोठी झाल्यावर आपण त्यांना समाज चिकटवतो . माझ्या मते हे योग्य नाही.
    दुसरी गोष्ट जो माणूस आयुष्यभर सांगत होता कि देव माणसात आहे दगडात नाही. त्यांच्या विषयी आपण लिहिलेले "एके दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला." वाक्य कितपत बरोबर आहे. ??

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने