स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन / Pramod Venkatesh Mahajan


(३ ऑक्टोबर १९४९ – मे २००६)

मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते.
पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायर्‍या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली. 

पहा व्हिडीओ इतिहास 



देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे ते पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. महाजन हे भारतीय जनता पक्षातील दुसर्‍या पिढीतील मोठे नेते होते.
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता.
प्रमोद महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले. प्रमोद महाजन हे एक उत्कृष्ट वक्ते मन्हून सर्वाना परिचित आहेत.
जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले.
एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावे असे प्रमोद महाजनांचे म्हणणे होते. 
२००६ साली त्यांच्या बंधूने केलेल्या गोळीबारात महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


------------------------------------------
हेही वाचा 
स्व.गोपीनाथ मुंडे यांचा इतिहास 
------------------------------------------

____________________________________________________________

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Pramod Venkatesh Mahajan

(3 October 1949 - 3 May 2006)

Born in a backward area like Marathwada, Pramod Mahajan was the leader of the ambitious and modern world think-tank.

For the first time in 1995, non-Congress government was formed in Maharashtra due to the foresight of the great dignitaries who went through such steps as Journalists, Teachers and National Politics.

They formed an alliance between the Balasaheb Thackeray and the Sena-BJP alliance.

He was one of the first party leaders of BJP, the main opposition party in the country. Mahajan was the second generation leader of the Bharatiya Janata Party.

Pramod Mahajan and Gopinath Munde, BJP's 25 years ago, started campaigning in the rural areas of Beed. Munde-Mahajan both of whom had stirred up the Maharashtra campaign.

Pramod Mahajan took over the defense ministry in the 13-day Vajpayee government in 1996. Pramod Mahajan is one of the best speakers and familiar to all.

Munde-Mahajan has done a great job to take the BJP to the national level through the Jana Sangh's miniseries.

Vasantrao Bhagwat strengthened this pair of RSS out of the disciplined leadership of Rashtriya Swayamsevak Sangh to give a comprehensive and nation-wide form to the party.

In a sense, Bhagwat made an able choice in Marathwada as an alternative to the Saranjmi leadership. Pramod Mahajan had to keep an eye on the constituency from the beginning.


Mahajan died in a firing by his brother in 2006.

------------------------------------------
Read also
History of Late Gopinath Munde
------------------------------------------

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने