अनंत लक्ष्मण कान्हेरे / Anant Lakshman Kanhere



अनंत लक्ष्मण कान्हेरे

(सन १८९२ - १९ एप्रिल १९१०). 

हे एक महाराष्ट्रीय क्रांतीकारक. बालपण आणि शिक्षण औरंगाबाद येथे. वीर सावरकरांच्या `अभिनव भारत' संस्थेचा तो सभासद होता. लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये राजद्रोहाबद्दल झालेल्या कारावासाच्या शिक्षेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र दडपशाही सुरू झाली. ह्या दडपशाहीचा बदला ब्रिटीश अधिकाऱ्यांचा वध करूनच घेतला पाहिजे, असे प्रामाणिकपणे मानणाऱ्यांपैकी कान्हेरे हा एक होता. त्या द्रूष्टीने त्याने आपले वास्तव्य नाशिकला हलविले. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथील जिवयानंद नाट्यगृहात एका समारंभास ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन आला आता ह्या तरूणाने त्याचा गोळ्या घालुन वध केला. ह्य गुन्ह्याबद्दल त्याला फाशी देण्यात आली. अशा रीतीने १८व्या वर्षीच त्याला हौतात्म्य प्राप्त झाले.



लेखक - वि. दा. फरांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

----------------------------------------------------------------

English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)


Anant Laxman Kanhere

(1892 - 19 April 1910).

This is a Maharashtrian revolutionary. Childhood and education at Aurangabad. He was a member of Veer Savarkar's Abhinav Bharat. Lokmanya Tilak was repressed everywhere in Maharashtra after the imposition of imprisonment for sedition in 1908. Kanhere was one of those who honestly believed that the repression should be executed by the British officers. He drove his real life to Nashik. On December 21, 1909, a young British Collector Jackson came up with a shot at the Jivyanand Natyagrha in Nashik. He was hanged for this crime. Thus, at the age of 18, he got martyrdom.


Author - Vi. Da Farande


Source - Marathi Encyclopedia

(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने