धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे / Dharmaveer Anand Chintamani Dighe




धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख होते.

मृत्यूः 26 ऑगस्ट 2001 ठाणे

आनंद दिघे हे शिवसेनेतील एक महत्त्वाचे नेते होते. शिवसेनेचा विस्तार वाढविण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. ते व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होते. हॉटेल व्यवसायातही त्यांनी जम बसविला होता. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी दिघेच्या निधनानंतर दुःख व्यक्त करतांना म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही पदासाठी कधीही आकांक्षा ठेवली नाही, परंतु पक्षात संघटनेसाठी होणाऱ्या आंदोलनात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या निस्वार्थ बोलण्याबद्दल त्यांना लोक लक्षात ठेवतील. पक्षासाठी त्यांनी केलेले कार्य हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरले. पक्षाच्या नेत्यांसाठी त्यांचे कार्य समर्पित होते.

ठाण्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून / त्यांचे निराकरण करण्यासाठी ते दररोज दरबार ठेवत. ‘शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना’ असा नारा देत गेल्या ४५ वर्षांपासून सर्वार्थाने ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आणि त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’अशी या शहराची राजकीय ओळख निर्माण झाली. १९६७ मध्ये वसंतराव मराठे यांच्या रूपाने शिवसेनेला ठाण्याने पहिला नगराध्यक्ष दिला. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत हे पहिले आणि तितकेच महत्त्वाचे यश होते. साहजिकच तेव्हापासून गेली चार दशके या शहरावर शिवसेनेची एकहाती हुकूमत राहिली आहे. आनंद दिघे म्हणजे तर शिवसेनेचा ढाण्या वाघच. आनंद दिघे हे जिल्ह्य़ातील राजकीय वाटचालीत एकमेव असे निर्विवाद नेतृत्व मानले गेले. आनंद दिघे यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ठाणेकरांनी सलग १९ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवली.

स्वर्गीय दिघे यांचेही ठाणेकरांशी जिव्हाळयाचे नाते होते. शहरातला टेंभी नाका हा केवळ शिवसैनिकांसाठी नाही, तर सर्वसामान्य ठाणेकरांसाठीही न्यायमंदिर होते. दिघे यांच्या कार्यपद्धतीविषयी कदाचित वेगवेगळे मतप्रवाह असतीलही, परंतु या शहरावर दिघेंची हुकूमत निर्विवाद होती, हे कुणालाही नाकारता येणार नाही. ठाणे आणि शिवसेना यांच्यामधील हा दुवा एक प्रकारची ऐतिहासिक ठेव मानली पाहिजे. जोवर आनंद दिघे होते तोवर शिवसेनेपेक्षा दिघे यांच्यावर विश्वास ठेवून आणि दिघेंच्या पश्चात त्यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणून ठाणेकरांनी शिवसेनेच्या पारड्यात मतांचे भरभरून दान घातलेय.  १९८९ मध्ये आनंद दिघे यांनी ठाण्याला मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर उत्तम सार्वजनिक व्यवस्था मिळावी म्हणून ‘टीएमटी’ परिवहन सेवा सुरू केली. स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र निर्णयक्षमता परिवहनला दिला.

ठाणे जिल्हय़ात ९०च्या दशकात शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केले. दिघे यांच्या कार्यपद्धतीवर लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस विश्वास ठेवेलच याची शाश्वती नाही. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना थेट मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी यथाशक्ती केले.

ठाणे व ठाणे जिल्ह्यावर, विशेषतः आनंद दिघेंवर बाळासाहेबांचे उदंड प्रेम .प्रत्येक निवडणुकीला शिवसेनाप्रमुख ठाण्यात यायचे. त्यांच्या सभा व्हायच्या, त्यांच्या भाषणाला तुफान गर्दी व्हायची. `मला ठाण्याची चिंता नाही. ठाणेकर माझे सगळे उमेदवार विजयी करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एखादी सभा घेईन,' अशा शब्दात ते ठाणेकरांवर विश्वास व्यक्त करत. `ठाणे जिल्हा माझा जिल्हा आहे. मी ज्या दगडाला शेंदूर फासेन, त्याला ठाणेकर विजयी करतील.' याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी बेलापूरमधील दिग्गज उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात सीताराम भोईर यांना आमदारकीसाठी उभे केले. यावर आनंद दिघे यांनी सर्वस्व पणाला लावून गणेश नाईकांसमोर काहीशा नवख्या अशा सीताराम भोईर यांना निवडून आणले. ठाण्याच्या विधानसभा मतदारसंघात चार भाग झाले तेव्हा ३ जागांवर शिवसेना निवडून आली. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे असे तिघेजण आमदार झाले.

ज्यावेळी उद्धव व राज यांच्यात धुसफूस सुरू होती, तेव्हा आनंद दिघे अस्वस्थ होते. या दोन्ही भावात संघर्ष झाल्यास आपण हिमालयात जाऊ किंवा शिवसेना प्रमुखांजवळ जाऊन राहू. मध्यंतरी काही वर्षापूर्वी बाळासाहेब यांनी मुंबईची जबाबदारी तू सांभाळ, नाशिक `राज’ पाहिल’ असे उद्धव ठाकरेंना सांगितले होते. ते त्यांचे वाक्य व निर्णय २०१२ मध्ये तंतोतंत खरं ठरले. मुंबई-ठाण्यात `उद्धवचे’ तर नाशकात `राज’चे प्रभुत्व झाले. २६ ऑगस्ट २००१, रोजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला होता.

२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा जन्मदिन. बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते "शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख".




English Translation- 

(Please read the important instructions which are at the bottom before reading the translation.)

Dharmaveer Anand Chintamani Dighe

Dharmaveer Anand Chintamani Dighe was a senior leader of Shiv Sena and Shivsena's Thane district chief.

Death: 26 August 2001 Thane

Anand Dighe was an important leader of the Shiv Sena. His role was to increase Shiv Sena's expansion. He was a builder by profession. He had also settled in hotel business. Former Deputy Chief Minister of Maharashtra and former Shiv Sena leader Chhagan Bhujbal, while expressing his grief over the death of Dighe, said that he never held any ambition for any post, but he enthusiastically participated in the movement for the organization. The people will remember them about their selfless talk. He has always encouraged Shiv Sena workers to work for the party. Their work is dedicated to party leaders.

They maintain daily durbar to listen to / solve the problems of Thane citizens. Shiv Sena's Thane-Thane Shivsena 'slogan' Shiv Sena's Thane-Thane Shiv Sena ' Thanekar stressed the Shivsena and hence the 'Shivsena's Thane' became the political identity of the city. Thane gave Shiv Sena the first municipal president in the year 1967 in the form of Vasantrao Marathe. This was the first and equally important achievement of Shivsena's political career. Naturally, since then, the Shiv Sena has been in limelight for the last four decades. Anand Dighe means that the Shiv Sena's rhetoric is waghcha. Anand Dighay was considered the only unquestionable leader in the political journey of the district. Thanekar, who lovingly relied on Anand Dighe for 19 years, kept the corporation in the hands of Shiv Sena.

Heavenly Dighe also had close relations with Thanekar. The only naka in the city is not only for Shiv Sainik but also for common Thane corporators. Although there may be different opinions about Dighe's methodology, but it is unquestionable that the rule of Digha was unquestionable in this city. This link between Thane and Shivsena should be considered as a kind of historical deposit. As soon as Joy was happy, Thanekar donated a lot of votes in Shiv Sena's Pardha, after believing in Dighe's faith, and after reaching the door for his work. In 1989, Anand Dighey started the 'TMT' transport service to give Thane a better public order in the best of Mumbai. Independent determination, independent decision making was given to transportation.

Shivsena's Thane District President Anand Dighe has done the task of reaching the Shivsena to root level in the Thane District in the '1990s. There is no certainty about the person who loves democracy on the basis of Dighe's methodology. However, Dighay did the right to send Shiv Sena chief Bal Thackeray to the Shiv Sena directly to the footpock.

Bal Thackeray's love for Thane and Thane, especially on Anand Dighe. Shivsena chief came to Thane in every election. Their meeting was about to become a storm. "I do not care about the situation. I am sure Thane will win all my candidates. So I will take a meeting in the last phase of campaigning, "he expresses his faith in Thanekar. `Thane district is my district. Thanekar will win the stone that I will give Shendur Fasan. ' With the same faith, he stood up against MLA Ganesh Naik for Belapur leader Sitaram Bhoir. On this, Anand Dighe took all the benefits and selected some newcomer Sitaram Bhoir in front of Ganesh Naik. Shiv Sena was elected to 3 seats in Thane assembly constituency. Eknath Shinde, Pratap Sarnaik and Rajan Vichare became the three MLAs.

When Uddhav and Raj were in trouble, then Anand Dighe was uncomfortable. If there is a fight between both of you, you should go to Himalaya or go to the Chief of Shivsena. After a few years ago, Balasaheb had told Uddhav Thackeray that he would take care of Mumbai's responsibility, Nashik's' Raj 'jhal'. Their sentences and judgments were exactly the same in 2012. In Mumbai-Thane 'Uddhav', 'Raj' was dominated by Nash. On August 26, 2001, Maharashtra was unaware of the death of Shivsena Thane district chief Anand Dighe.

January 27 is the birthdays of Anand Dighe. Balasaheb loved Dighe like a son. The relationship between the two leaders of Balasaheb and Dighe survived to the end. Dighe was a witness to many incidents of Shiv Sena's movement. There was a light torch. He was always accused of being a parallel government with bullying. They had their loyalty to Shiv Sena and Shiv Sena. Help in free way was their religion. In his "Darbara", Mullah-Maulvi, pastor along with the sadhusa also saw that the person who had the power to choose four MPs and eight ten MLAs would have been the minister as well. But for a lifetime, Shiv Sena lived in Shivsena with the same title as Shiv Sena. Thane district chief ".


(Important Notice- We are trying to improve translations in English. If there are any suggestions, mistakes, changes, please send us an email to oacnagar@gmail.com This is not intended to hurt anyone's feelings.)
(महत्वपूर्ण सूचना - आम्ही इंग्रजीत भाषांतर सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. काही सूचना, चुका, बदल असतील तर आम्हाला oacnagar@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Tags:
Anand Dighe Biography in Marathi | आनंद दिघे जीवन परिचय
धर्मवीर आनंद दिघे यांची गोष्ट। anand dighe lifestory biography
धर्मवीर आनंद दिघे
धर्मवीर आनंद दिघे चित्रपट
धर्मवीर आनंद दिघे साहेब
आनंद दिघे भाषण
आनंद दिघे पत्नी
आनंद दिघे जयंती

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने