ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतल्या शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. देव यांनी त्यांच्या सिने कारकिर्दीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
रमेश देव हे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. १९७१ साली आलेल्या आनंद आणि ताकदीर या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांचा जन्म अमरावतीत झाला. त्यांचे आजोबा हे अभियंता होते तर वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते.
रमेश देव यांनी १९५१ मध्ये बाल कलाकार म्हणून पाटलाची पोर या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका केली. आरती हा त्यांचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता. त्यांनी दिग्दर्शन आणि अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे.
त्यांनी जवळपास २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सीमा देव, अभिनेते पुत्र अजिंक्य देव तसेच दिग्दर्शक पुत्र अभनय देव आणि त्यांचे कुटुंबिय आहेत.
राजकारणातही रमेश देव यांनी आपली झलक दाखवली होती. रमेश देव यांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवली होती. १९९६ साली ते लोकसभा निवडणुकीला शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव 'देव’ झाले.
एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला होता.
रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका केल्या होत्या. रमेश देव यांनी चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन अशा तीनही माध्यमातून प्रदीर्घ काळ मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिका साकारल्या. रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण एक पाहुणा कलाकार म्हणून केले.
निर्माते आणि दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या १९५० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रमेश देव यांना छोटीशी भूमिका साकारली होती. दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचा पोर’ या चित्रपटात भूमिका साकारली. रमेश देव यांनी संख्या चित्रपट काम केले. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.
टिप्पणी पोस्ट करा